निरक्षीर विवेक - चांगले वाईट ओळखण्याची बुद्धी - हंसाला पाण्यातून दूध वेगळं करता येत असा संस्कृत सुभाषितात उल्लेख आहे.
कासवीची दृष्टी - कृपा दृष्टी - कासावीच्या पिल्लाचे पोषण तिच्या केवळ दृष्टी क्षेपानेच होते असे म्हणतात. तिला दूध येत नाही तरी केवळ तिच्या ममतेने पिल्लांची वाढ होते.
कासवीचे तूप- असंभवनीय गोष्ट - कासावीला दूध नसते त्यामुळे नसेल तर तूप कुठले?
तक्षकाच्या फणीतील मणी - अप्राप्य वस्तू - नागाच्या डोक्यात मणी असतो असा कवी संकेत आहे. तक्षक हा नागांचा राजा असल्याने त्याच्या डोक्यातील मणी काढून घेणे ही अशक्य गोष्ट.
निंबलोण उतरवणे - कडुनिंबाची पाने, मीठ, मोहरी इत्यादी पदार्थ भोवती ओवाळून दृष्ट काढणे.
माथा हुंगिला - पुत्रवत प्रेम केले - वडील आणि मूळ मध्ये प्रेम दर्शविण्याची पद्धत. पूर्वी वडील मुलाचे कौतुक करायचे वेळी, भेटीच्या किंवा निरोपाच्या वेळी मस्तक हुंगीत असे.
अष्ट दिग्गज - पृथ्वीच्या आठ दिशास राहून तिला आपल्या डोक्यावर उचलून धरणारे आठ हत्ती. (पुराणातील उल्लेख)
खाराची पुटे - झळाळी देणे, चमकावणे -सोन्याला उजाळा देण्यासाठी सोरा या खाराचा उपयोग करतात. त्यामुळे सोने अधिकाधिक तेजस्वी दिसू लागते.
पाचवीला पूजणे - एखाद्या गोष्टीचा सतत त्रास होणे - लहान मूल जन्मल्यावर पाचव्या किंवा सहाव्या दिवशी पूजा करून दिवा लावून ठेवतात. जेणेकरून सटवाई बाळाला त्रास द्यायला आली तर निघून जाईल. ह्यावरून एखाद्या गोष्टीचा सतत त्रास होत असल्यास पाचवीला पूजणे असे म्हणतात. "गरिबी त्याच्या पाचवीला पुजलेली होती. - तो खूप गरीब होता."
अठरापगड - निरनिराळ्या तर्हेची माणसे - "गावाच्या जत्रेच्यावेळी अठरापगड माणसे भेटतात."
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा