पाऊस हा प्रत्येकाचा लिहायचा, अनुभवायचा विषय आहे.. काय आठवत पाऊस म्हणल्यावर? आम्हाला शब्द संचय करताना पाऊस म्हणल्यावर हे शब्द आठवले.. तुमचे काय? वाचून कसे वाटले प्रतिक्रियांमध्ये नक्की कळवा आणि अजून असेच छान छान शब्द आमच्या संचयात जोडायला सुचवत रहा..
- नव्हाळी - पानाफुलांचा पहिला बहर
- मोराचे केकारव - मोराचा आवाज
- बेडकाची डराव डराव
- मृदगंध - मातीचा सुवास
- पागोळी - गच्चीत साठलेले/कौलांच्या पन्हळीतून खाली पडणारे पावसाचे पाणी
- आभाळ येणे/ शिराळ पडणे - ढगाळ वातावरण
- तिरीप - पावसाचे घरात येणारे पाणी
- विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट
- वीज - विद्युल्लता
- इरले - कुंची सारख्या आकाराचा रेनकोट. हे इरले शेतीची पावसाळ्यातील पेरणी करताना, भात लावताना जास्त वापरतात.
- पावसाची नक्षत्रे आठवली असतील - मृग, आर्द्रा, पुनर्वसू, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा, उत्तरा, हस्त
- पाऊस कसा पडतोय तुमच्याकडे?
- रिमझिम / झिमझिम / रिपरिप
- संततधार
- मुसळधार
- सरीवर सरी
- श्रावण सरी
- पावसाचे राग - मल्हार वर्ग
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा